Author Topic: ओल्या चिबं पावसात....  (Read 1249 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
ओल्या चिबं पावसात....
« on: March 21, 2014, 01:02:45 AM »
भेटताच चिंब पावसात,
मन पाहून तुला थिजलं...
झेलत हलक्‍या सरी,
अन् अंग चिंब भिजलं...

पाहिलीस तू मला अन्,
भिजताना तुझ्या संग...
मिटून अन् डोळे तुझे,
साठवलीस नवे रंग...

माझ्यात तू, ये सामवं,
जाण या प्रितीचा गंध....
स्‍पर्शूनी तू या उरी,
दरवळला प्रेमाचा सुगंध...

चुंबता अन् उरास या,
भासतो नवा तरंग...
ह्दयात पेटती आग अन्,
वाटे विझवावं तुझ्या संग...

------------ ------------
स्वयंलिखीत :-
©स्वप्नील चटगे.
(21-मार्च-2014)
« Last Edit: March 21, 2014, 01:04:29 AM by Lyrics Swapnil Chatge »

Marathi Kavita : मराठी कविता