Author Topic: तिथे चंद्र आणि इथे मी...  (Read 1133 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
तिथे चंद्र आणि इथे मी...
« on: March 27, 2014, 02:01:10 PM »
जरी असले हसरे चेहरे,
तरी दु:ख लपवतो मनी,
फार एकाकी जगतो आहे.
तिथे चंद्र आणि इथे मी...

असतील लाखो चांदण्या,
या मन भुलवाया परी,
तरी एकटा जगतो आहे.
तिथे चंद्र आणि इथे मी...

नको मज लाखो एक पाहिजे,
जी प्रेम खरे मज करी !!
अशी एक चांदणी शोधतो आहे.
तिथे चंद्र आणि इथे मी...

दिसतील पास न असता साथ,
तरी आस हि आहे मनी,
म्हणूनच राती भटकतो आहे.
मज भेटेल कधीतर कुणी...
तिथे चंद्र आणि इथे मी...
तिथे चंद्र आणि इथे मी...

                      - प्रसाद पाटील

Marathi Kavita : मराठी कविता


pravin mane

  • Guest
Re: तिथे चंद्र आणि इथे मी...
« Reply #1 on: March 27, 2014, 02:38:19 PM »
kavita