Author Topic: मृत्यूच्या वाटेवर …. तुझं प्रेम  (Read 1563 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
मृत्यूच्या वाटेवर …. तुझं प्रेम
-----------------------------------------
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुएमे उडाता चला गया …
हे तुझं आवडतं गाणं
अन जगतोसही तू अगदी तसाच
म्हणून तर तुझ्यावर भाळले मी

अजूनही आठवतो तू भेटल्याचा क्षण
तुझ्यात माझं गुंतत जाणं
माझ्यात तुझं हरवत जाणं
किती बेमालूमपणे मिसळलो दोघं एकमेकांत

तुझं निरपेक्ष वागणं ते निरागस हसणं
खूप गुंतलोय तुझ्यात असं म्हणतांनाही
तुझ्या माझ्यात अंतर ठेवणं
या भावनांवर भाळत पुरते अडकले तुझ्यात

कुठल्याही वासनांचा मनात विचार नाही
कसं जमतं तुला तुलाच ठाऊक
त्या सिगरेटच्या धुरासारख्याच वासना असतात
काही क्षणांचा जीव त्यांचा
म्हणून तू त्यांना मोकळं सोडून दिलं माझ्यावरच्या प्रेमासाठी

इतकं निष्पाप मन कुठे भेटणार मला
म्हणून भिती वाटतेय तुझ्यापासून दुरावण्याची
मृत्यू तर जणू निघालाच आहे मला घ्यायला
तरी तू धीर देतो आहेस
कदाचित त्यालाही मी तरुणच हवी आहे
हल्ली तुझ्या ओठांवर एकच गाणं रूळलंय

अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं
अभी अभी तो आयी हो अभी अभी तो …
खरच रे आत्ताच भेटल्यासारखा वाटतो आहेस तू मला
==================================
संजय एम् निकुंभ , वसई दि. ५.४.१४ वेळ : ५.३० स.