Author Topic: सुखाचे चांदणे  (Read 1229 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
सुखाचे चांदणे
« on: April 19, 2014, 05:44:08 AM »
सुखाचे चांदणे
================
मनी ध्यानी नसतांना
तू आयुष्यात आलास
उधळून प्रेम सारे
पूर्णत्व देऊन गेलास
भेटले नव्हते कधी
असे सुखाचे चांदणे
चंद्र होऊन ओंजळ
सुखाने भरून गेलास
तुझाच मनात विचार
ध्यास तुझाच असतो रे
या काळजाला तुझा
गुलाम करून गेलास
===============
संजय एम निकुंभ , वसई

Marathi Kavita : मराठी कविता