Author Topic: तीच्यासोबतची ती पहिली भेट  (Read 2302 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
तीच्यासोबतची ती पहिली भेट
मला आजही आठवते
ती बसली होती बाजुला
मला ते स्वप्नच वाटत होते
बोलायच होत बरच काही
पण शब्दच फुटत नव्हते
माझ्या मनात ती बोलेल
तीच्या मनात मी बोलेन
आधी बोलायच कुणी
मग मीच सुरूवात केली
गप्पांची मैफील सुरू झाली
ती बोलण्यात दंग होती
आणि मी तीला पाहण्यात
तीचे ते मधेच स्मित हासणे
हळूच डोळ्यावरील केस मागे घेणे
सर्व काही अविस्मरणीय होत
माझ्या कल्पनेच्या पलीकडल होत
ती मला काही सांगत होती
हेच मला उमजत नव्हत
जणु मला भानच नव्हत
शेवटी तीचे शब्द कानावर पडले
'संध्याकाळ झाली आता मी निघते'
तीने जाऊ नये असच वाटत होते
तरी जाणे भाग होते
मीही तीलाा हसत हसत निरोप दिला
दोघांच्या मनात एकच प्रश्न
पुन्हा कधी भेटायच?
पुन्हा कधी भेटायच?

$ vidyakalp $

Marathi Kavita : मराठी कविता


Harshal a ghuge

  • Guest
Re: तीच्यासोबतची ती पहिली भेट
« Reply #1 on: April 22, 2014, 02:41:00 PM »
Nice

Offline rasna

  • Newbie
  • *
  • Posts: 6
Re: तीच्यासोबतची ती पहिली भेट
« Reply #2 on: April 22, 2014, 03:50:14 PM »
Khup Chan Ahe Post.................Same Thing Happen With Me........ :)