Author Topic: ... तुझ्या गावच्या वाटेवरी  (Read 1280 times)

Offline sachin_sawant

  • Newbie
  • *
  • Posts: 12
  • Gender: Male
बरस बरस बरसाव
तुझ्या गावच्या वाटेवरी
स्पंदनांचे थेंब होवून
जमाव खोल मनाच्या काचेवरी
पागोळ्यांतुनी गाता गाता
साठवूनि घ्यावे कॄष्णमेघ उरी
ओल्या नभाची किनार नक्षी
गोंदवून घ्यावी काळजावरी
भिजल्या कौलांवरुन उडावे
होऊन ओला पक्षी
भिरभिरता विरुन जावे
तुझ्या क्षितीजावरी
दाटून यावे मेघामेघांतुनी
तुझ्या गावच्या वाटेवरी