Author Topic: कधीच वाटलं नव्हतं प्रिये  (Read 1701 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कधीच वाटलं नव्हतं प्रिये
=================
कधी असं वाटलं नव्हतं
चेहरा कुणाचा छळायला लागेल
पापण्या मिटून घेतल्या तरी
काळजात तोच दिसायला लागेल
 
कुणाचं हसणं मनात ठासून
पाठलाग करत मागे फिरेल
इतकं वेड लावून मनाला
हृदयी वसंत प्रेमाचा फुलेलं

कुणाचं साधं बोलणही कानांत
नकळत घुमत राहू लागेल
दूरवर असूनही तो आवाज
सतत ऐकू येऊ लागेल

तिचं रूप पाहून अंबाड्य़ातलं
मन तिच्यात गुंतू लागेल
तिच्याच स्वप्नात मन हरपून
तिचा मला नाद लागेल

प्रेम बीम ठाऊक नसतांना
मन प्रेमाचं होऊन जगेल
कधीच वाटलं नव्हतं प्रिये
आयुष्यात मला प्रेम भेटेलं 
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि . २४.०४.१४ वेळ : ६.३० संध्या .