Author Topic: प्रेम  (Read 2103 times)

Offline lina.jadhav10@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 1
प्रेम
« on: April 24, 2014, 11:33:29 PM »
तुझे प्रेम बोलावते मला
पण पुढे जायला भीती वाटते,
दुरूनच बघत राहिले तर
खरच ते खूप छान दिसते...

तुझे प्रेम बोलावते मला
रोज देत असते मला हाक,
मागे वळून मैत्रीकडे बघावे
तर ती देत असते धाक..

तुझे प्रेम बोलावते मला
तुला मला बघून गोड हसत असते,
तुझ्या माझ्या  मैत्रीला
दुरूनच गोंजारत असते...

तुझे प्रेम बोलावते मला
डोकावते नेहमी राहून मैत्रीच्या आड,
रुसून मग लहान मुलासारखे
बोलते पुरे झाले आता मैत्रीचे लाड...

तुझे प्रेम बोलावते मला
त्याकडे बघून कधी कधी डोळे येतात भरून,
विश्वास आहे तुझ्यावर माझा
वाटते बघावे एकदा तुझ्यावर प्रेम करून....!!

                                  ----लिना
« Last Edit: April 24, 2014, 11:34:17 PM by lina.jadhav10@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता