Author Topic: हनी तुझ्याशिवय आता जगणे नाही...  (Read 1261 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
हनी तुझ्याशिवाय आता जगणे नाही...

कितीही संकटे आली
कितीही मिसअंडरस्टांडिंग झाली तरी
तुझी साथ आता सोड़णे नाही
हनी तुझ्याशिवाय आता जगणे नाही...
तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे
माझ्या ध्यानी मनी फ़क्त तूच आहे
तुझ्यावरच प्रेम आता संपणे नाही
हनी तुझ्याशिवाय आता जगणे नाही....
क्षणभर दूर रहावत नाही
दुसर्यबरोबर पहावत नाही
तुझ्यापासून दूर आता रहाणे नाही
हनी तुझ्याशिवाय आता जगणे नाही...
प्रेम म्हणजे नक्की काय माहीत नाही पण
शरीर आकर्षण मन ह्याहून नक्कीच वेगळ काही
तुझ्या ह्रुदयापासुन आता दूर जाणे नाही
हनी तुझ्याशिवाय आता जगणे नाही...
मागचे सात जन्म पाहिले नाहीत
पुढचे सात जन्माच माहीत नाही तरी
प्रत्येक जन्म माझा फक्त तुझ्याच साठी
हनी तुझ्याशिवाय आता जगणे नाही....
हनी तुझ्याशिवाय आता जगणे नाही....

......तुझ हनी (अंकुश )
     ( स्वलिखित)
दि. २७/०४/२०१४
वेळ. ११:०१ सकाळी
« Last Edit: April 27, 2014, 11:41:15 AM by Ankush Navghare »