Author Topic: रुपाला मी तुझ्या कसे वर्णावे.....  (Read 1625 times)

Offline Tushar Bharati

  • Newbie
  • *
  • Posts: 13
शब्दानाही माझ्या बंधन आहेत,
कविता तरी मला कसे सुचावे...
सांग शोना मला...
रुपाला मी तुझ्या कसे वर्णावे.....

बागा सुन्या तुझ्यावीन
पाहून तुला फुलानाही वाटे रुसावे...
गालावर खळी पाहून तुझ्या
वाटे तू सदा असेच हसावे....

उसने सौंदर्य तुझेच त्या चंद्राला
उपमा त्याची तुला कसे द्यावे...

दिवसा निघता तू ,
न राहावून सुर्यानेही तुला लपून पाहावे....

सांग शोना मज...
रुपाला मी तुझ्या कसे वर्णाव

तुषार भारती .....