Author Topic: तुझ्या प्रसन्न हसण्यातून  (Read 3260 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
तुझ्या प्रसन्न हसण्यातून
अन बोलक्या डोळ्यातून
एक चैतन्य उमटते
श्वासामध्ये संगीत होते

तुझ्या नितळ ओठातून
अन सावळ्या कांतीतून
एक सौदर्य पसरते
मला मंत्रमुग्ध करते

तुझे बोलणे रोखून पाहणे
आणि सहजतेने वावरणे
माझे मन मोहून टाकते
तुलाच फक्त पाहत राहते


तू रागावून ओठ दुमडून
बोले लटका आव आणून
माझे जगणे कविता होते
शब्दावाचून गाणे गाते

विक्रांत प्रभाकर
/


« Last Edit: May 13, 2014, 09:54:58 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Gourishankar

  • Guest
Re: तुझ्या प्रसन्न हसण्यातून
« Reply #1 on: July 10, 2014, 05:39:58 PM »
 :) Mast...