Author Topic: तू नसतास भेटला तर  (Read 2221 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तू नसतास भेटला तर
« on: May 15, 2014, 08:26:25 PM »
तू नसतास भेटला तर
===============
दिवसभर वेड्यासारखी
तुझाच विचार करत बसते
तू नसतास भेटला तर
मी कसे जगले असते

जगण्याच्या साऱ्या दिशांना
अंधाराने कवटाळले होते
प्रकाशाचे किरण काळजात
मला कसे दिसले असते

तू भेटलाच नसता तर
आयुष्य माझे उजळले नसते
माझ्याही नकळत जीवन
माझे कोमेजून गेले असते

या वळणावर भेटलास तू
नियतीचेच असतील संकेत
नाही तर प्रेमाचे क्षितीज
माझ्या मुठीत आलेच नसते
-------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि.१५.५.१४  वेळ : ८.१५ रा .       
   Marathi Kavita : मराठी कविता