Author Topic: तुला आठवणेही  (Read 2377 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तुला आठवणेही
« on: May 15, 2014, 08:38:29 PM »
तुला आठवणेही ……………संजय निकुंभ
==============
तुझे अनमोल क्षण
मी जपून ठेवते
तू जवळ नसतांना
त्यात हरवून जाते

तूच दिसतोस मला
माझ्या प्रत्येक क्षणात
तुला आठवणेही जगणे
हसरे करून जाते

खरचं तुझा लळा
कसा लागला मनास
माझ्याच मनाला प्रश्न
मी करीत असते

जाऊ दे तो विचार
करण्यात काय अर्थ
तुझ्या प्रेमात स्वर्गाचे
सुख मी अनुभवते
=================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १५. ५. १४  वेळ : ८.३० रा .   

Marathi Kavita : मराठी कविता