Author Topic: आवडतं मला पुन्हा नव्याने तिचे व्हायला ..........  (Read 2303 times)

सोपं आहे आपलेसं करणं
प्रेम करणं मात्र कठीणच

गुलाब किती सुंदर असतं
काट्यासारखं  सोबत राहून  जगणं
आहे खूप कठीणच

आवडतं ते गुलाब सर्वांनाच
पण जीव त्याचा त्या काट्यांतच

असंच आहे आमचंही हि नातं
आंबट कधी
तर कधी खूप गोडच
तूटून  पडलो तरी
आवडतं मला पुन्हा नव्याने तिचे व्हायला ..........

-
©प्रशांत डी शिंदे
दि.२१-०५-२०१४« Last Edit: May 21, 2014, 12:02:16 PM by प्रशांत दादाराव शिंदे »