Author Topic: तुझ्याविना माझं प्रेम फक्त मातीच माती...  (Read 2638 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
वाटे जरी ग कठीण,
माझे बोल माझं मन..
माझ्या मनाचा ओलावा,
जर स्पर्शून जाण..

माझं प्रेम ग साजणी,
जसा मातीचा हा गोळा..
तुझ्या प्रेमाचा ग याला,
जर हाथ लाव थोडा..

घडे कुंभार घडवे,
तसा घडवना याला..
जर चुकला कुठे तो,
थोडं सावर ग याला..

जन्मोजन्मी टिकाव हे,
असं भज शेक त्याला..
तुझे रुसवे फुगवे,
जरा पाहू दे न याला..

जग आठवेल याला,
काढ असे नक्षीकाम..
सखे तुझे ते नखरे,
तुझे माझे काही क्षण..

असा सुंदर हा घडा,
घडे तुझ्याच हाती..
तुझ्याविना माझं प्रेम,
फक्त मातीच माती..
तुझ्याविना माझं प्रेम
फक्त मातीच माती...
                      - प्रसाद पाटील

Marathi Kavita : मराठी कविता


rajesh patil

  • Guest
chhaan lihile ahe....

mala jar ithe kavita upload karaychi asel tar mi kashi karu shakto.??

Kalu bhagat

  • Guest
Ek kavita lihishil ka,
Je prem karayache vay asate tya vayat te prem karat nahi, parntu he tyana nantar janvat. 1 rec