Author Topic: अजूनही काळजाचा एक ठोका चुकतोच .......  (Read 2671 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
अजूनही काळजाचा एक ठोका चुकतोच .......

अजूनही काळजाचा एक ठोका चुकतोच
जेव्हा तू अचानक समोर दिसतेस ,
मी भानच हरपून  जातो
जेव्हा तू नाजूक हसतेस ,
पडतो विसर मला शब्दांचा
जेव्हा तू टपोरी पद्धत्तीने बोलतेस ,
मी वेगळ्याच दुनियेत जातो
जेव्हा तू मोहक डोळ्यांनी पाहतेस ,
मी माझ्या स्वरात तुझाच सूर शोधतो
जेव्हा तू अबोल होऊन बसतेस ,
पुन्हा मी  तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो
जेव्हा तू दृष्टीआड होऊन कदीच गेलेली असतेस . 

मयुर जाधव
कुडाळ  ( सातारा ).
+918888595857