Author Topic: खूप काही बोलायचे  (Read 2709 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
खूप काही बोलायचे
« on: June 12, 2014, 08:17:51 PM »
खूप काही बोलायचे
पण बोलता न येते
शब्द सारे दाटलेले
आकाश उगा असते

रित्या ओंजळीत माझ्या
रिती रिती प्रीत आहे
तुझ्या हाती मेंदीतल्या
नक्षीदार गीत आहे

कितीदा मनात तुझे
हात या हातात घ्यावे
नाव गाव लौकीकाचे
बंध सारे झुगारावे

परी तीच जुनी रीत
हात माझे खेचतात
ओठातून तेच जुने
शब्द मोघम येतात

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: June 14, 2014, 03:31:39 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता