Author Topic: ती.....  (Read 2611 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
ती.....
« on: June 18, 2014, 10:46:53 AM »

रोज सकाळी ती हसुन गाणे गाते
मला पाहता तिची कळी खुलते

डोळ्यात भावनांचा कळ्ळोल दिसावा
नयानांचे शर ती मागे सोडून जाते

गाण्यात तिच्या कधी प्रीत फुलावी
बरसात फुलाची ती करून जाते

केस मोकळे तिचे कधी पक्षी बनती
हलकेच मोगऱ्याची ती वेणी माळते

चंचलतेने ती कधी झाडी अंगण
अंगणात कधी तीची प्रीती फुलते

दिसताच तिच्या समोर पहावे नखरे
लाज लाजूनी ती अल्लड हसते

श्री प्रकाश साळवी दि १८ जून २०१४

Marathi Kavita : मराठी कविता