Author Topic: तुझी ओळख  (Read 2600 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तुझी ओळख
« on: June 21, 2014, 05:21:26 PM »
तुझी ओळख
=====================
तुझ्यातल्या निष्ठुरतेला
घट्ट आवळून बसली आहेस
तीच तुझी ओळख
तू करून बसलीय

दगडाला पाझर फुटेल तुझ्या मनाला नाही
याची पूर्ण जाणीव असूनही
माझं संवेदनशील मन
तुझ्यावर प्रेमाचा वर्षांव करतंय

त्यानं पाहिलंय तुझ्या मनात
भावनाशिलतेचा एक झरा
एक दिवस तोच झरा
उसळून बाहेर येईल सगळ्या वादळांना झिडकारून

मी वाट पाहत राहीन त्या क्षणाची
इथे माझ्या हार जीतचा प्रश्न नाहीये
मी प्रेम अन माझं सर्वस्व पणाला लावलंय
बघू यां …. आनंदाचे तुषार मिळतात की वेदनांच्या लाटाच
=====================================
संजय एम निकुंभ , वसई दि. २१.६.१४ वेळ ७.३० स .

Marathi Kavita : मराठी कविता