Author Topic: नकोस विचारू मजला जाऊ का  (Read 2118 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
जावू का मज
नकोस विचारू
हो म्हणता सखी 
ग, येतच नाही |
तुझा निरोपी
चेहरा स्मरता
शब्द मुखातून
फुटतच नाही |
असो सभोवती
तुझी गुणगुण
तयावीण मज
सुचतच नाही |
तव शब्दातील
गोड रुणझुण
आणखी जीवास 
कळतच नाही |
असतो क्षणांचा
वेग अनावर
काळ हळू हळू 
का होतच नाही |
उद्या घडे काय
कुणास ठावूक
हात हातातून   
सुटतच नाही |
 
विक्रांत प्रभाकर

 

« Last Edit: June 26, 2014, 12:32:49 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


pooja mane

  • Guest
Re: नकोस विचारू मजला जाऊ का
« Reply #1 on: June 27, 2014, 08:32:49 PM »
 ;) ;)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
Re: नकोस विचारू मजला जाऊ का
« Reply #2 on: June 27, 2014, 08:40:58 PM »
thanks puja