Author Topic: माझ्या सोबत बाजूला बसून  (Read 1545 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
माझ्या सोबत
बाजूला बसून
माझ्या कविता
कुणी ऐकते

कधी वाहवा
मस्त उमटते
कधी फसली
स्पष्ट सांगते

माझ्या कवितेत
तिचे असणे
तिला मला
नित्य आवडते

डोळ्यात तिच्या
इंद्रधनू अन
गालावरती
वर्षा येते

खरच सांगतो
कविता जगणे
याहून सये
वेगळे नसते

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: July 16, 2014, 10:44:56 PM by विक्रांत »