Author Topic: समोर तू दिसताना...  (Read 2562 times)

Offline Pravin R. Kale

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
समोर तू दिसताना...
« on: July 14, 2014, 01:51:11 PM »


 समोर तू दिसताना
एकटक मी तुलाच पाहतो
नजरेला नजर भिडली
तरीही मी मूकाच राहतो
बोलत जरी तू असली
मी मात्र शांतच राहतो

समोर तू दिसताना
भान मी विसरतो
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
तुलाच मी शोधतो
तू दिसताच मात्र
शांतच मी राहतो

समोर तू दिसताना
शब्दच मी हरवतो
तुला भेटण्याआधी
ठरवलेले सारे
बोलने मी विसरतो...
समोर तू दिसताना
मी स्वतःलाच विसरतो...   

 Pravin R. Kale
8308793007

Marathi Kavita : मराठी कविता


Abhimanyu Gore

  • Guest
Re: समोर तू दिसताना...
« Reply #1 on: July 15, 2014, 08:35:43 AM »
Lay bhari kavita ahe tumchi