Author Topic: कशी म्हणू हि प्रीत अधुरी  (Read 1304 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कशी म्हणू हि प्रीत अधुरी
===================
तुझ्या माझ्यातली अपूर्णताच
नात्याची गोडी वाढवत रहाते
प्रत्येक क्षणी तुझी ओढ
मनास माझ्या लागून रहाते

कशी म्हणू हि प्रीत अधुरी
हि प्रीतच मला जगवत रहाते
माझे अवघे जगणे सजणी
तुझी सावली होऊन रहाते

झाले दोन हृदयांचे मिलन
त्यातच प्रेम सारे मिळते
शरीर स्पर्शाची आस सखे
कधी मनात डोकावत नसते

कुणा वाटेल…  हे खरे
असेही प्रेम असू शकते
पण खऱ्या प्रेमाला वासनेची
थोडीही किनार कधीच नसते

वाटते कधी तुला मिठीत घ्यावे
ती भावनाही निरागस असते
तेवढीच राहील एक आठवण
ती प्रीतीची मागणी असते

पण जेव्हाही येतो तुझ्यासमोर
पाऊल नेहमीच अडखळते
वाटते आपल्यातली अपूर्णताच
प्रेमालाही हवी असते
=====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १६.०७.१४  वेळ : ७.०० स .