Author Topic: पुन्हा रुजू येता प्रीत ...  (Read 1104 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
मनातील प्रश्न सारे
मनामध्येच राहू दे   
चुकलेल्या उत्तराने
वर्ष व्यर्थ जातात रे

तुटलेत धागे जरी 
काही मनी जपावेत
पुन्हा रुजू येता प्रीत
नवे स्वप्न फुलावेत 

जीवनाच्या वादळात
कधी कुणी हात देत
आतल्या जखमावर
हळूवार फुंकारत
 
संशयाची छाया मनी
पडूनिया देवू  नको
हाती येता पुन्हा फुले
उधळून देवू नको

छोटेशीच जिंदगानी
भराभर वर्ष जाती
सुटल्याची खंत नको
सुटू देत खोटी नाती   

अशी हास खळाळून
आनंदाने झळाळून 
बाकी सोड सारे सारे
प्रीती कर उधाणून
 

विक्रांत प्रभाकर


« Last Edit: July 19, 2014, 07:05:14 PM by MK ADMIN »