Author Topic: ॥॰॥ प्रेम बीम याचच का नाव ॥॰॥  (Read 1936 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
तू वेळ येईल
तस वागत गेलास
कधी नात फुलवत
कधी मिटवत गेलास
प्रत्येक वळणावर तूच बरोबर
हे अपसुख पटवत गेलास
मी कधीच नव्हते मुर्ख
वेडी तर नव्हतेच नव्हते
पण एक ओढ होती कुठेतरी आत
कसलतरी वेड होत
घेवून बरोबर जात
कसली ओढ ठाऊक नाही
कसल वेड ठाऊक नाही
अंधारल्या वाटा तरी
बोट धरुन चालत राही
सगळ कळत असल तरी होत सगळ हव हव
प्रेम बीम म्हणतात सारे
ह्याचेच का ते नाव?