Author Topic: काय पाहिलं मी तुझ्यात..........  (Read 3651 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
काय पाहिलं मी तुझ्यात .........

पाहिले तुझे डोळे कि क्षणात
माझे पाहणारे डोळे अलगद मिटून जातात ,
तुझे ते बोलके डोळे क्षणभरात
माझ्या मनी खुप घाव करून जातात ,
तुझा तो आवडणारा आवाज कानी पडतो
अन् तुझ्याशी बोलताना मग माझा स्वर अडखळतो ,
तुझ्या या मोहक आवाजाचे स्वर बरसतात
अन् माझ्या काळजाच्या तारा छेडून जातात ,
तू नेहमी मला खुप हसवतेस
अन् मी तुला हसवताना माझी मजा पाहतेस ,
प्रत्येक संवादच तू सोनेरी करतेस
अन् माझ्या आठवणींच्या मैफिलीला
सोनेरी रंग देऊन नकळत निघून जातेस .

मयुर जाधव ,
कुडाळ ( सातारा ),
+918888595857.


Marathi Kavita : मराठी कविता


bhushan kirte

  • Guest
Re: काय पाहिलं मी तुझ्यात..........
« Reply #1 on: July 19, 2014, 08:22:02 PM »
nice bhava....

.. " खुप छान " ...

swapnil pandhare

  • Guest
Re: काय पाहिलं मी तुझ्यात..........
« Reply #2 on: July 22, 2014, 09:42:23 AM »
 ;)ek no.astat marthi kavita,ek no astat marthi mans,kae manto bhava,ha tar ahe marthi maeva!!!!!!!