Author Topic: प्रेम …… विश्वासाचं नातं  (Read 3114 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
प्रेम …… विश्वासाचं नातं
=============================
प्रेमाला स्वच्छंद फुलपाखरासारखं उडू द्यावं
नेहमी फक्त निरागस प्रेमाचं शिंपण करीत रहावं
कुठल्याची बंधनात त्याला न अडकवता
आपल्या मर्जीन त्याला जगू द्यावं

येतात वादळेही कधी कधी प्रेमात
शांतपणे त्यांना काळाबरोबर वाहू द्यावं
प्रेम आपसूकच येत आपल्या प्रेमाजवळ
कुठल्याही वचनांच ओझं प्रेमावर न लादावं

प्रेम लोणच्यासारखं मनामनांत मुरु द्यावं
स्वतःच अस्तित्व विसरून प्रेमाचं होऊन जगावं
मग कुठलीही गोष्ट प्रेमाला विलग करू शकत नाही
हेविश्वासाचं नातं असं सहज फुलवत न्यावं .
---------------------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. १९.७.१४  वेळ : ६.४० स .   


Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
hmmm bolayala khup soop ahe

PRAKASH CHAKOTE

  • Guest
I