Author Topic: मैत्री केली आहेस म्हणुन  (Read 2466 times)

Offline hitendrakhairnar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय.......
 
 गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
 सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
 
 रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
 भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
 
 आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
 जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
 
 तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू  नकोस
 व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
 
 मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
 दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
 
 समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
 
 विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
 जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

                                                                       Author Unknown.......