Author Topic: ती राधा...  (Read 1800 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ती राधा...
« on: July 22, 2014, 08:47:41 PM »


खुपच दिवसांनी
आज भेट झाली,
तीच हसरी मुद्रा
चेहऱ्यावर लाली !

डोळ्यात स्वप्ने
कित्तेक साठलेली,
भेटला जिवलग
म्हणुनी आनंदलेली !

किती, काय सांगू?
कोडयात पडलेली,
स्वत:लाच क्षणभर
विसरून हरवलेली !

वाटू, लुटू किती?
प्रेमा आसुसलेली,
शाम सावळ्याची
ती राधा जाहलेली !

©शिवाजी सांगळे
« Last Edit: July 22, 2014, 08:55:12 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता