Author Topic: हे प्रेम नव्हे या जन्माचे  (Read 2102 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
हे प्रेम नव्हे या जन्माचे
=================
अवघा रंगची एक झाला
तुझ्या माझ्या प्रेमाचा
अर्थ उलगडला आता
तुझ्या माझ्या नात्याचा

तुझे माझे भेटणे
खेळ होता विधात्याचा
हे प्रेम नव्हे या जन्माचे
हा भाव युगायुगाचा

आहेस तू राधा
मी कृष्ण जन्मजन्माचा
डोळ्यात तुझ्या पाहिला
तो भाव ओळखीचा

हि प्रीत जन्मांतरीची
ठोका चुकला काळजाचा
तो एक क्षण भेटला
मला तुझ्या नजरेचा
===================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २३.७.१४  वेळ : ९.१५ रा .