Author Topic: लावले वेड तू  (Read 2258 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
लावले वेड तू
« on: July 27, 2014, 05:53:38 PM »
लावले वेड तू
===================
भान हरवले डोळे मिटले
सख्या लागली समाधी
तू भेटता बुडून गेले
मी तुझ्या प्रेमामंधी

काही कळेना कशी आले
मी या मोकळ्या रानामंधी
सोडून माझे केस मोकळे
बेभान झाले स्वप्नामंधी

गेला रे तोल माझा
येशील नां मज भेटण्या
वाट पहाते मन माझे
उचलून घेशील बाहुमंधी

झाली रे मी आंधळी
इतके लावले वेड तू
अशी काय जादू आहे
कळेना तुझ्या प्रेमामंधी
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि.२७.७.१४ वेळ : ७. ५० स .

Marathi Kavita : मराठी कविता