Author Topic: निरपेक्ष प्रेम जगण्याचं साधन होऊन जातं  (Read 1451 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
निरपेक्ष प्रेम जगण्याचं साधन होऊन जातं
==========================================
कायमचं झपाटून टाकणारं प्रेम मिळणं हे कुणाच्याही नशिबात नसतं
आपण कसं प्रेम करतो त्यावर हे अवलंबून असतं
प्रेमात जर स्वार्थ नसेल कुठल्याही अपेक्षेविना झालेलं असेल
तर ते प्रेम कायम वेड लावणारं असतं

मान्य आहे अशी व्यक्ती जीवनात येणं
हीच खूप कठीण गोष्ट आहे
पण असं प्रेम मिळणं अन ते टिकवून ठेवणं
हे सारं आपल्या हातात असतं

असं कुणी भेटलंच आयुष्यात त्याला खूप जपायचं असतं
येणाऱ्या वादळांना हसत तोंड द्यायचं असतं
विश्वास ठेवा आपल्या प्रेमावर निरपेक्ष प्रेम करत रहा
अस प्रेम कधीच कुणी सोडून जात नसतं

प्रत्येक क्षण व्यापून जातो आपल्या मनाचा
फक्त प्रेमच जगण्याचं साधन होऊन जातं
प्रेमाचा अर्थ समजावून सांगता यायला हवा
दूर असूनही जीवन सुंदर होऊन जातं
========================
संजय एम निकुंभ , वसई
दि.२८. ७. १४ वेळ : ६. १५ स .