Author Topic: रोज रोज मी तुलाच.......  (Read 2001 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
रोज रोज मी तुलाच.......
« on: July 28, 2014, 10:13:05 AM »
रोज रोज मी तुलाच आसवात ढाळतो
चांदवा मनातलाच पापण्यात नाहतो

का अशी तुझीच प्यास
लागते क्षणा क्षणास
सांगतो पुन्हा मनास
यायची न ती कधीच वाट काय पाहतो

सावलीस आपुल्याचं
घेउनी प्रिये कवेत
गीत हे तुझेच गात
या फुलात चांदण्यात एकटा शहारतो

वेड हे "तुझेच" खास
लोक बोलती मलाच
आस पास होत भास
शोधतो दिशा दिशांत रात्र रात्र जागतो

बेहेरे मकरंद

Marathi Kavita : मराठी कविता