Author Topic: मी कधीच हरवले होते  (Read 1820 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
मी कधीच हरवले होते
« on: July 30, 2014, 07:47:45 AM »
मी कधीच हरवले होते
==================
तुझी प्रत्येक धडपड
तुझी प्रत्येक तडफड
नजरेतन माझ्या सुटत नव्हती

तुझं ते चोरून बघणं
मी बघताच नजर वळवणं
माझी नजर टिपत होती

तुझं फडफडणार काळीज
मला जपत असलेलं मन
मी दुरूनच न्याहाळत होती

तुझा ओझरता स्पर्श
तुझ्या नादावणाऱ्या गंधात
मी नकळत हरवत होती

तू व्यक्त केलेस तुझे प्रेम
तेव्हा चक्क नाही म्हणाले
पण हृदयात तुझ्या प्रेमाने
कधीच जागा घेतली होती
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३०. ७. १४  वेळ : ७. ३० स .

Marathi Kavita : मराठी कविता