Author Topic: तुझे स्वप्न जेव्हा दिसे  (Read 1989 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
तुझे स्वप्न
जेव्हा दिसे
माझे दु:ख
मला हसे

तुझा मोह
रात्रंदिनी
पावुलात
बेड्या दोन्ही

कसे मना
समजावू
कसे किती
दूर ठेवू

हरविले
सुख माझे
तया दिसे
रूप तुझे

तुटू द्यावे
तुटू नये
जुळू द्यावे 
जुळू नये 

सुख दु:खी
हिंदकळे
अजूनही
वेडे खुळे


विक्रांत प्रभाकर
« Last Edit: July 30, 2014, 11:03:53 PM by MK ADMIN »