Author Topic: ।। गोडवा ।।  (Read 1668 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
।। गोडवा ।।
« on: August 02, 2014, 12:16:03 PM »
तोच गोडवा असेल का ह्या क्षणाला..
का प्रश्न पड़े तोच सारखा मनाला..!!

अबोलीचा गजरा भाळतो का केसाला..
का वेड लागावे त्या सुमनाला..!!

कर्णफुले ती सुखावतात का कानाला..
का आकर्षण असावे हे सुवर्णाला..!!

काजळी सुरमा भिडतो का नयनाला..
का आलिंगतात दोघे क्षणा क्षणाला..!!

पाकळ्या गुलाबी चुंबतात का अधराला..
का गोडवा असावा हां गुलकंदाला..!!

माळायचे होते ग चंद्र सूर्य भाळाला..
का नव्हते स्वीकार ग प्राक्तनाला..!!
*चकोर*

Marathi Kavita : मराठी कविता