Author Topic: स्मृती तुझ्या...  (Read 1702 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
स्मृती तुझ्या...
« on: August 03, 2014, 12:44:27 PM »


सजवून फुले, खुप मोगऱ्याची
भासतो आभास, तुज गंधाचा,
देतो गंधाळून, भोवताल माझा
अवखळ, हा खेळ वाऱ्याचा !

विसरायचे तुला, स्मृती तूझ्या
ठरवून बजावतो, स्वतः मनाला,
अचानक येता, उचकी कधी
होतसे शांत, तूझ्याच नावाला !

ठरविले लिहायचे, हेच होते
आनंदात, तूझ्या वाचून आहे,
अश्रूच ओघळले, कागदावर आधी
उचलावयाचे, अजुनी पेन आहे !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता