Author Topic: तुझे असणे माझ्यातले  (Read 3897 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तुझे असणे माझ्यातले
« on: August 06, 2014, 07:06:44 AM »
तुझे असणे माझ्यातले
================
जिकडून तुझा गंध येतो
ती वाऱ्याची दिशा ठरते
तुझ्याच खिडकी समोरी
चंद्राचेही पाऊल अडते

तू गाढ झोपेत असतांना
सूर्याचे मन तुझ्यात विरघळते
पहाटेला तेजपुंज किरणे
तेव्हा धरणीवर पडते

तुझाच गंध लेवुनी
कळी अंगणातली उमलते
तो गंध श्वासास येऊनी
तू माझ्यात दरवळते

दवबिंदूही तुझा चेहरा
त्यांच्यात सामावून घेते
म्हणून प्रत्येक दवबिंदूत
तूच मला दिसते

तुझे असणे माझ्यातले
जगणे किती सुंदर करते
म्हणून प्रत्येक क्षणी माझे
मन तुझ्या प्रेमात जगते
===============
संजय एम निकुंभ , वसई
दि. ६. ८. १४  वेळ : ६. ५० स .Marathi Kavita : मराठी कविता


Ram m Dhumale

  • Guest
Re: तुझे असणे माझ्यातले
« Reply #1 on: October 23, 2014, 05:44:52 PM »
Good kavita

Ram m Dhumale

  • Guest
Re: तुझे असणे माझ्यातले
« Reply #2 on: October 23, 2014, 05:45:45 PM »
Very nice

Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
Re: तुझे असणे माझ्यातले
« Reply #3 on: October 24, 2014, 01:06:28 PM »
मस्तच छान  :)