Author Topic: चुकलो मी...  (Read 2736 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
चुकलो मी...
« on: August 13, 2014, 12:55:52 PM »
माहित आहे मला, तू रागावलेली आहेस..
माझ्यावर फार फार, रुसलेली आहेस..

खर सांगतो तुला काय, घडी ती ग होती..
बरोबर तू मी, फक्त वेळ साथ नव्हती..

वाटत असेल बहाणा,हा तुला सर्व काही..
कारण याच खर कारण,तुला ठाऊक नाही..

खरंच तुला दुखवायचा,हेतू माझा नव्हता..
विश्वास ठेव माझ्यावर,मी नाही ग खोटा..

रागात असा मुळीच काही,निर्णय घेऊ नको..
अशी मला आज तू,सोडून जाऊ नको..

एका चुकीमुळे असं, दूर सारू नको..
इतक घट्ट नात आपलं,सैल करू नको..

माफ कर अशी पुन्हा,चूक होणार नाही..
शब्द देतो तुला,असं वागणार नाही...
शब्द देतो तुला,असं वागणार नाही...

Marathi Kavita : मराठी कविता


vaishu dhote

  • Guest
Re: चुकलो मी...
« Reply #1 on: August 13, 2014, 03:20:45 PM »
 :D ::) ;D :'(