Author Topic: डाव  (Read 1225 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
डाव
« on: August 14, 2014, 06:19:20 PM »
डाव
=============
तू भेटणार होतीस
मज कुठे ठाव होते
तुझ्या डोळ्यात माझ्या
प्रीतीचे गावं होते

जे उमलले हृदयी
तुझेच भाव होते
जे कोरले काळजावर
ते तुझेच नावं होते

प्रीत अशी भेटेल
स्वप्नात माझ्या नव्हते
नियतीने खेळलेले
हे सारे डाव होते
=================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १४. ८. १४ वेळ : ७. ३० स .

Marathi Kavita : मराठी कविता