Author Topic: तुझ्या प्रेमाची लहर मला येते.  (Read 1858 times)

Offline svjangam

  • Newbie
  • *
  • Posts: 11
आभाळागत माया तुझी मला खूप भावते.
तुझ्या प्रेमाचे रोप मनी माझ्या लावते.
प्रीत तुझी नी माझी अंधारात सजते.
तुझ्या प्रीती मधे मन माझे भिजते.
तुझ्या प्रेमाची लहर मला येते.
जसे उनात पावसाची सर कशी येते .

हिमालयाचा शिखरावर तुझे प्रेम मला नेते .
तुझ्या प्रेमाने मन माझे भुलते.
रोज रात्री माझ्या स्वप्नात तू येते .
तुझ्या प्रेमाचा ठेवा मजला देऊन तू जाते.
तुझ्या प्रेमाची लहर मला येते.
जसे उनात पावसाची सर कशी येते .

तुझ्या प्रेमाला आहे कस्तुरीचा गंध .
मनाला लागला आहे तुझ्या प्रेमाचा छंद.
रेशमाचा धाग्याने प्रेम तू माझे विणले.
तुझ्या प्रेमाने मन माझे भरले .
तुझ्या प्रेमाची लहर मला येते.
जसे उनात पावसाची सर कशी येते.

सुनिल जंगम 
९९६९७२४३५४

« Last Edit: August 18, 2014, 08:38:49 AM by svjangam »