Author Topic: होकार  (Read 2922 times)

Offline N...J

  • Newbie
  • *
  • Posts: 2
होकार
« on: August 22, 2014, 01:27:12 PM »

तू फक्त मजला होकार द्यावा
भावनांचा भोवरा हळूवार शमावा

तिच्या एका नजरेने मन माझे खुलते,
तिने दुर्लक्ष करता ते कोमेजून झुरते


तिला पाहताना मी जगाला विसरतो,
पण तिला विसरताना मी एकटाच उरतो

मनाला वाटायचं तिच्याशी एकदा तरी बोलाव,
मनातल गुपित हळूवार खोलाव

पण भीती वाटायची मला तिच्या नकाराची,
भावना न कळणार्या जगाच्या हास्याची

नकळत करेल ती माझ्या भावनांचा चुराडा,
आणि ढासळेल तोल या हळव्या नाजुक मनाचा

मन राहवेना,
मग तिच्या मागे दिवसेंदिवस फिरलो,
राञी माञ निष्पर्ण झाडासारखा झुरलो

मनातली तगमग उसळत होती,
तिची नेहमीची वाट खुणवत होती

एक दिवस केली हिम्मत गाठलं तिला,
र्निमनुष रस्त्यावर घडला एक सिलसिला

तीच ती आणि तोच मी पण ध्येय माञ वेगळ,
डोळ्यात बघून तिच्या वधलो होतो मी सगळ

माझ तुझ्यावर प्रेम आहे तुझ आहे का माझ्यावर,
साथ देशील का मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

ती माझ्याकडे बघत होती भावनाविरहीत चेहर्याने,
मी माञ बघत होतो उत्तराच्या आशेन


ती दचकली,
तिला काहीच उमजेना,
शेवटी ती आली भानावर,
तिचे हळूवार शब्द पडले माझ्या कानावर


ती म्हणाली मला दे थोडासा वेळ,
आयुष्य म्हणजे नाही बावला बावलीचा खेळ


मी निशब्द झालो ती माञ निघून गेली,
तिला पाठमोरी जाताना पाहून मी एकच मागणी केली


तू फक्त मजला होकार द्यावा
भावनांचा भोवरा हळूवार शमावा

Marathi Kavita : मराठी कविता

होकार
« on: August 22, 2014, 01:27:12 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Suyog gahte

  • Guest
Re: होकार
« Reply #1 on: September 09, 2014, 10:55:12 AM »
तू फक्त मजला होकार द्यावा
भावनांचा भोवरा हळूवार शमावा

तिच्या एका नजरेने मन माझे खुलते,
तिने दुर्लक्ष करता ते कोमेजून झुरते


तिला पाहताना मी जगाला विसरतो,
पण तिला विसरताना मी एकटाच उरतो

मनाला वाटायचं तिच्याशी एकदा तरी बोलाव,
मनातल गुपित हळूवार खोलाव

पण भीती वाटायची मला तिच्या नकाराची,
भावना न कळणार्या जगाच्या हास्याची

नकळत करेल ती माझ्या भावनांचा चुराडा,
आणि ढासळेल तोल या हळव्या नाजुक मनाचा

मन राहवेना,
मग तिच्या मागे दिवसेंदिवस फिरलो,
राञी माञ निष्पर्ण झाडासारखा झुरलो

मनातली तगमग उसळत होती,
तिची नेहमीची वाट खुणवत होती

एक दिवस केली हिम्मत गाठलं तिला,
र्निमनुष रस्त्यावर घडला एक सिलसिला

तीच ती आणि तोच मी पण ध्येय माञ वेगळ,
डोळ्यात बघून तिच्या वधलो होतो मी सगळ

माझ तुझ्यावर प्रेम आहे तुझ आहे का माझ्यावर,
साथ देशील का मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

ती माझ्याकडे बघत होती भावनाविरहीत चेहर्याने,
मी माञ बघत होतो उत्तराच्या आशेन


ती दचकली,
तिला काहीच उमजेना,
शेवटी ती आली भानावर,
तिचे हळूवार शब्द पडले माझ्या कानावर


ती म्हणाली मला दे थोडासा वेळ,
आयुष्य म्हणजे नाही बावला बावलीचा खेळ


मी निशब्द झालो ती माञ निघून गेली,
तिला पाठमोरी जाताना पाहून मी एकच मागणी केली


तू फक्त मजला होकार द्यावा
भावनांचा भोवरा हळूवार शमावा

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):