Author Topic: कधी तरी शेती करून पहा  (Read 1916 times)

Offline nakode.sachin8

  • Newbie
  • *
  • Posts: 2
कधी तरी शेती करून पहा
« on: August 24, 2014, 10:11:44 AM »
नांगराला बैलं जुंपुन पहा
आपली पीकं
बहरणारी शेती
मनात साठवून पहा,

पीकं पाहून होणारा आनंद
आन् मातीचा मोहक सुगंध
मनात साठवून पहा


फुलणारा कष्टाचा मळा
अन् कोकीळेचा सुरेल गळा
अशातच न्याहारीचा
आनंद घेऊन पहा

केलेल्या कष्टाचे न िमळणारे चीज
नेहमीच अपूरी िमळणारी वीज
यांचा धाक बाळगून पहा

शेतकरी कष्ट करतो
अन् दुिनयेचं पोट भरतो
पण
देव नेहमी त्याला दु:खच का बरं देतो

त्याच्या दु:खाला आधार देऊन पहा
कधी तरी शेती करून पहा.

-सिचन नाकोडे
चांदवड. िज. नािशक
7588012871

Marathi Kavita : मराठी कविता


Tanaji Jagtap

  • Guest
Re: कधी तरी शेती करून पहा
« Reply #1 on: September 28, 2014, 01:26:56 AM »
khup chan