Author Topic: जसा मी दवबिंदू नि तू उमलता गुलाब,  (Read 1718 times)

Offline Tejas khachane

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • तू आणि फक्त तूच……
    • www.tejasandcompany.webs.com
जसा मी दवबिंदू नि तू उमलता गुलाब,
जुळेल का ग तुझा नि  माझा
आपला एक राग……….

स्पर्श होतो जेव्हा माझा
तुझ्या पल्लवांना
ह्रिदय तुझेही खूप
मोहरून येत असेल
जसे उमलत्या कळीचे
फुल होत दिसेल

भाव मलाही सतत
असाच काही जाणवतो
जेव्हा तुझ्या पाकल्यान्वर्ती
मी विश्रांती घेतो ,

स्पर्श तुझ्या काट्यांचाही
हवासा वाटतो… 
जेव्हा पलकात तुझ्या
मी स्वताला कुरवाळतो. 

एकच प्रश्न तुला….
त्याचा दे मला जवाब
जसा मी तूझा दवबिंदू
तू होशील का माझा गुलाब 

(तेजस खाचणे )