Author Topic: साद हीच देत आहे...  (Read 1275 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
साद हीच देत आहे...
« on: August 30, 2014, 10:47:31 AM »
वाट वाट एक एक
खुप दूर जात आहे
प्रेम प्रेम मनी मनी
पुसटसे होत आहे
कण कण वाळु वाळु
हातातून सुटत आहे
क्षण क्षण हळु हळु
दुसर्याचा होत आहे
मनो मनी भाव भावनांचा
लवलेश संपत आहे
स्तब्ध स्तब्ध मन मन
डोळ्यांतुन वहात आहे
तेच तेच भास भास
स्वप्न सारे स्वप्न आहे
नको जाऊ दूर दूर
साद हीच देत आहे...
साद हीच देत आहे...
... अंकुश नवघरे.©
(स्वलिखित)
२९.०८.२०१४.

Marathi Kavita : मराठी कविता