Author Topic: अनोळखी  (Read 1458 times)

अनोळखी
« on: August 31, 2014, 12:13:46 PM »
रती  जागविल्या  मी  तुझ्यासाठी,  किती सांगू मी सखी ,
ओळखही नाही दिलीस तू मला , मी झालो अनोळखी …

तुझ्या शब्दांचे हार गळा घालुनी, फिरलो दारोदार मी सखी,
विसरलीस तू  दिल्या शब्दांना , माझे  हास्यही  झाले  अनोळखी  …

भावनांचे हुन्द्कारगीत गात आहे  , तुजसाठी मी सखी,
तुझ्या शब्दांनीही  साथ सोडली , माझ्या गीताची , माझे गीत ही  झाले अनोळखी  …

कसला हा प्रवास ,संपेनाही  वाट …  कधी होईल पहाट?  , सांग  ना सखी ?
थकलो आता मिटतो डोळे ,ही वाट  आहे मजसाठी अनोळखी …

कवी ,
गणेश  दामोदर गायकवाड
०९८३३९६४४७६Marathi Kavita : मराठी कविता

अनोळखी
« on: August 31, 2014, 12:13:46 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):