Author Topic: मनाच्याही नकळत  (Read 3773 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
मनाच्याही नकळत
« on: September 02, 2014, 10:01:03 PM »
मनाच्याही नकळत
==========================
मी कसं देऊ तुझ्या प्रश्नाचं उत्तर
अन कसा शोध लावू तुझ्या प्रश्नाचा
कुठे असेल दडून बसलेलं
तुझ्या प्रश्नाचं उत्तर

चोहीकडे हिरवं रान पसरलंय
एकसारखा  दिसतोय हिरव्या गवताचा ताफा
अन तू म्हणतेस
यातलं कोणतं सुंदर दिसतंय

कितीतरी सुंदर क्षण भेटले तुझ्या सहवासात
ज्यामुळे तू मला आवडत गेलीस
त्यातला नेमका कोणता क्षण
हे कसं सांगू शकेन मी तुला

तरी तू हट्ट करतेस तो क्षण सांगण्याचा
जेव्हा मन तुझ्या प्रेमात हरवलं
पण वेडे तू तरी सांगू शकशील कां
तुझं मन कुठल्या क्षणी भाळलं

नको विचार करूस इतकां
नाही कुणालाही असं प्रेम गवसत
ज्याला यायचं असतं नां आयुष्यात
तो असाच येतो मनाच्याही नकळत
=========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २ .९ .१४  वेळ : ९.२०  रा .   

Marathi Kavita : मराठी कविता


arpita deshpande

  • Guest
Re: मनाच्याही नकळत
« Reply #1 on: September 08, 2014, 05:08:19 PM »
नको विचार करूस इतकां
नाही कुणालाही असं प्रेम गवसत
ज्याला यायचं असतं नां आयुष्यात
तो असाच येतो मनाच्याही नकळत ....Always Miss You Sir..RIP..__/\__

arpita deshpande

  • Guest
Re: मनाच्याही नकळत
« Reply #2 on: September 08, 2014, 05:29:15 PM »
नको विचार करूस इतकां
नाही कुणालाही असं प्रेम गवसत
ज्याला यायचं असतं नां आयुष्यात
तो असाच येतो मनाच्याही नकळत ....Always Miss You Sir..RIP..__/\__