Author Topic: प्रतिक्षेत....  (Read 1886 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
प्रतिक्षेत....
« on: September 06, 2014, 07:35:35 AM »
प्रतिक्षेत....

कधी तरी
यायचे होते
कुशीत सखे
ठेवून डोके
अश्रु मोकळे
करायचे होते !

सांग कुठवर
आवरू मनाला
कल्लोळ अखंड
उरी भावनांचा
तूजवाचुन सारे
सांगू कुणाला !

फीरूनी त्याच
संकेतावर येणे
आभासी प्रतिक्षेत
अश्रुंचा पाझर
तनुगंध तूझा
दरवळून जाणे !

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता