Author Topic: ते फळ तू दिलेले  (Read 1224 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
ते फळ तू दिलेले
« on: September 13, 2014, 09:49:29 PM »
ते फळ तू दिलेले
मधुर लाल रसिले
माझ्या ओठावर
तरंगत राहिले
पण ते तुझे अर्धे
असतेस तू दिले
तर अधिक मधुर
असते लागले
हे ही भाग्य पण
कमी नसे माझे
काही मिळे मज
तुझिया हातचे

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: September 14, 2014, 05:36:39 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता