Author Topic: फेवर  (Read 1160 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
फेवर
« on: September 14, 2014, 04:42:52 PM »
इतके का करतोस
तू मजवर फेवर
ती म्हणाली तेव्हा
मनात म्हणालो
शब्दांनी सारेच काही
सांगायला हवे का ?
खरच तिला काही
कळतच नाही का ?
पण वरवर हसलो
अन तिजला वदलो
ही मैत्री आहे बर !
तुझी छोटी कामे
जड का असतात
तुझ्याशी बोलतांना
सहज होवून जातात
वेडे मन परंतु
स्वत:शीच पुटपुटले
अरे तिला सारे
पाहिजे सांगितले
तुझ्याशी बोलणे
हसणे हरवणे
हे एवढे काही
सुंदर असते की
त्या पुढे ते
छोटे छोटे फेवर
काहीच नसते
किंबहुना तुजवर
फेवर करायची संधी
हिच तुझी मजवर
मोठी फेवर असते !!

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: September 14, 2014, 05:36:17 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता